Riteish Deshmukh : ‘महाराजांबाबत आक्षेपार्ह शब्द खपवून घेणार नाही’, धीरेंद्र शास्त्रींसह संजय गायकवाडांना यांच्या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांचं वक्तव्य

हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा जय शिवाजी हा भव्यदिव्य मराठी चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Riteish Deshmukh : ‘महाराजांबाबत आक्षेपार्ह शब्द खपवून घेणार नाही’, धीरेंद्र शास्त्रींसह संजय गायकवाडांना यांच्या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांचं वक्तव्य

हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा जय शिवाजी हा भव्यदिव्य मराठी चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त रितेश देशमुख व अभिनेत्री जेलिना देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी व महाआरतीसाठी शनिवारी सायंकाळी आले होते. यानिमित्त त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठाची महती मी बरीच ऐकली होती. त्यामुळे मी आज याठिकाणी येऊन दर्शन घेतले आहे. हे भव्यदिव्य मंदिर व या परिसरातील कलाकृती मधून महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्वांसमोर मांडला आहे. महाराजांच्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी एवढे भव्य मंदिर उभारले या बद्दल शिवक्रांती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंद करीत, या शक्तीपीठ ठिकाणी मी आज आलो आणि भविष्यात येत राहणार अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी दिली. 

यावेळी रितेश देशमुख यांना आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र महाराज बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काढलेल्या आक्षेपार्ह विधाना बद्दल विचारले असता मी काही ऐकलेले नाही, मला ते विषय माहीत नाहीत, असे बोलत रितेश देशमुख यांनी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही असे स्पष्ट केले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number