इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने मुंबई, ठाणे, कोकणासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे सर्व भाग महागाईच्या वणव्यात होरपळले आहेत. भाज्या, फळे, डाळी आणि दुधाचे दर वधारल्याने सामान्यांच्या घरखर्चात वाढ झाली आहे. माल वाहतूकदारांनी भाडेवाढ केल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. डाळींच्या दरांतही किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.
भाज्यांचे दर (प्रति किलो)
भाज्या घाऊक किरकोळ
भेंडी ४० ६० ते ८०
दुधी भोपळा २२ ४० ते ६०
फरसबी ११० १२५ ते १४०
फ्लॉवर १८ ४० ते ६०
गवार ५५ ८० ते १००
शिमला मिरची ३६ ६० ते ८०
कोबी २४ ४० ते ६०
वाटाणा १२० १५० ते १८०
वांगी २८ ६०
डाळींचे दर (प्रति किलो)
डाळी घाऊक किरकोळ
मसूर ७७ १४०
उडीद १०५ ११५
मूग १०५ १२०
तूर १०५ १२८