राहुल गांधाींच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन भडकले ऋषी कपूर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   राजकारण असो किंवा बॉलिवुड ‘वंशवाद’ सगळीकडेच पाहायला मिळतो. मंगळवारी अमेरिकेच्या बर्कले इथल्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक विषयांवर मते मांडली. पण, बॉलिवूडचा सर्वात मोठा परिवार ‘कपूर कुटुंबा’चे सदस्य ऋषि कपूर यांना राहुल गांधांनी वंशवादावर केलेल्या विधानावरुन ऋषि कपूर भडकले. राहुल यांच्या विधानावर ऋषि कपूर यांनी त्यांचा […]

राहुल गांधाींच्या  ‘त्या’ वक्तव्यावरुन भडकले ऋषी कपूर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

राजकारण असो किंवा बॉलिवुड ‘वंशवाद’ सगळीकडेच पाहायला मिळतो. मंगळवारी अमेरिकेच्या बर्कले इथल्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक विषयांवर मते मांडली. पण, बॉलिवूडचा सर्वात मोठा परिवार ‘कपूर कुटुंबा’चे सदस्य ऋषि कपूर यांना राहुल गांधांनी वंशवादावर केलेल्या विधानावरुन ऋषि कपूर भडकले. राहुल यांच्या विधानावर ऋषि कपूर यांनी त्यांचा राग व्यक्त करत एकामागून एक ट्विट केले. राहुलने वंशवादावरुन बॉलिवूडच्या काही कुटुंबांची नावं घेतली त्यामुळेच ऋषि कपूर यांच्या रागाचा पारा चढला.

 

कॉंग्रेस पार्टीवर नेहमीच वंशवादाला पाठिंबा दिल्याचा आरोप लावला जातो. या मुद्दावर कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीमध्ये बोलताना त्यांनी संपूर्ण देश असाच चालत असून माझ्या मागे पडू नका असे म्हटले आहे. अखिलेश यादव (सपा नेता मुलायम सिंह यादव यांचा मुलगा), स्‍टालिन (डीएमके सुप्रीमो करुणानिधि यांचा मुलगा), धूमल यांचा मुलगा (अनुराग ठाकुर) यांना सर्वांना वंशदानाची देणगी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय अभिषेक बच्चन आणि अंबानी देखील वंशवादाच्या परंपरेत मोडत असल्याचे सांगत भारत अशाच रितीने चालत असल्याचे म्हटले आहे.  

 

राहुल यांनी विधानात अभिषेक बच्चन यांचा उल्लेख केला पण, कपूर कुटुंबाचा उल्लेख केला नसला तरी ऋषि कपूर यांनी ट्विटरवरुन चांगलाच समाचार घेतला आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number