गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लडबाजी

नाशिकच्या ठक्कर डोममधील घटना चांगलीच चर्चेत आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शहरात झालेल्या कार्यक्रमात युवकांनी हुल्लडबाजी करीत गोंधळ घातला. यावेळी दोन छायाचित्रकारांना मारहाण करण्यात आली. तर, हुल्लडबाजी करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला. नाशिकमधील ठक्कर डोम येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा हुल्लडबाजी

नाशिकच्या ठक्कर डोममधील घटना चांगलीच चर्चेत आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शहरात झालेल्या कार्यक्रमात युवकांनी हुल्लडबाजी करीत गोंधळ घातला. यावेळी दोन छायाचित्रकारांना मारहाण करण्यात आली. तर, हुल्लडबाजी करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला.

नाशिकमधील ठक्कर डोम येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभागृहात काही मद्यपी युवक गोंधळ घालत होते. याचे चित्रण माध्यम प्रतिनिधींनी केले. याच रागात युवकांनी दोन पत्रकारांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरूवात केली.

हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच जखमी झालेल्या दोन्ही पत्रकारांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number