संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आज इंदापूर येथे संपन्न झाला. यावेळी प्रथम रिंगण सोहळ्यात महिला तुळस घेऊन महिलांनी प्रदिक्षणा पूर्ण केल्या त्यानंतर विणेकरी, पताका धारक वारकरी, पोलीस बांधव यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर मानाच्या आश्वाने संत तुकाराम महाराज पादुकांना तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण इंदापूर इथे पार पडलं. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडला. हा अभुतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केली होती. अनेक दिवसांचा पायी प्रवास, ऊन पावसाची तमा न बाळगता भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी पांडुरगाच्या दर्शनाची आस घेऊन निघाले आहेत. हे सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, वीणेकरी, तुळशीवाल्या महिला पालखीभोवती हरिनामाचा गजर करत रिंगणाभोवती उभ्या होत्या.
यावेळी प्रथम रिंगण सोहळ्यात महिला तुळस घेऊन महिलांनी प्रदिक्षणा पूर्ण केल्या त्यानंतर विणेकरी, पताका धारक वारकरी, पोलीस बांधव यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर मानाच्या आश्वाने संत तुकाराम महाराज पादुकांना तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. गोल रिंगणामध्ये पालखीभवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्यांची गर्दी असते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.