जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत राईट टू पी या संस्थेच्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी या महिला भेटायला आल्या होत्या. या महिला टमरेल घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि नेतर सुटका केली.
शहरात महिलांसाठी शौचालय नाहीत याचा निषेध म्हणून या महिला कार्यकर्त्या वर्षा बंगल्यावर धडकल्या होत्या.
यानंतर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी या महिलांची भेट घेवून त्यांच्या आंदोलानाला पाठिंबा दर्शवला.