राज्यात पालकमंत्रिपदाचा तिढा कायम

मुंबई, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असल्याचे दिसते. मंगळवारी देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. पण या सोहळ्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार यावरून वाद सुरू आहे. आतापर्यंत ३ वेळा ध्वजारोहण करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. निवडक जिल्ह्यांमध्ये मंत्री तर मोजक्या ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, असे जाहीर करण्यात आले. यानंतर पहिली यादी […]

राज्यात पालकमंत्रिपदाचा तिढा कायम

मुंबई, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असल्याचे दिसते. मंगळवारी देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. पण या सोहळ्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार यावरून वाद सुरू आहे. आतापर्यंत ३ वेळा ध्वजारोहण करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे.

निवडक जिल्ह्यांमध्ये मंत्री तर मोजक्या ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, असे जाहीर करण्यात आले. यानंतर पहिली यादी प्रसिद्ध झाली. या यादीत बदल करत काही तासांच्या अंतराने दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. दुसरी यादी आली तरी तिढा सुटेना. अखेर पुन्हा बदल करून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. ताज्या यादीनुसार पुणे जिल्ह्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहेत. पुणे जिल्ह्यात चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यापैकी कोण ध्वजारोहण करणार यावरून तिढा निर्माण झाल्याचे समजते.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ ऑगस्ट रोजी स्थगित करण्यात आले. पण मंत्रिमंडळाचा विस्तार स्वातंत्र्यदिनानंतर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. स्वातंत्र्यदिनाकरिता ध्वजारोहण करणाऱ्यांची यादी ही तात्पुरती सोय आहे. पालकमंत्र्यांची यादी ही मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जाहीर केली जाणार आहे. पण ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांच्या यादीवरून तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा बघता पालकमंत्री जाहीर करताना शिंदे – फडणवीस – पवार सरकारची तारेवरची कसरत होणार असल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत शिवाजी पार्क येथे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत. पुणे जिल्ह्यात राज्यपाल रमेश बैस तर रायगड जिल्ह्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार आहेत. अजित पवार कोल्हापूर जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत. दादा भुसे धुळ्यात तर गिरीश महाजन नाशिकला ध्वजारोहण करणार आहेत. छगन भुजबळ हे अमरावती जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number