जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
गेल्या पाच दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपलं आहे. रायगड जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका आणि आंबा या प्रमुख
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाला आहे. तर रोहाच्या कुंडलिका नदीनं गेल्या तीन दिवसांत दोन वेळा धोक्याची पातळी ओलाडली.
तर अलिबाग,पेण, महाड, माणगावं, पोलादपूर या तालुक्यांना पावसानं झोडपून काढले आहे. ऐन सणासुदीच्या काळात बाप्पांच्या
आगमनापासून पावसानं या आनंदाच्या उत्सवात गणेशभक्तांची चांगलीच हिरमोड केली आहे.
हवामान खात्याने येत्या 48 तासांत अतिवृष्टिचा इशारा दिला आहे.