Chhatrapati Sambhajinagar Crime: 50 लाखांच्या व्यवहारातून थरार! आधी खणला खड्डा, मग प्राध्यापकावर त्यांच्याच पिस्तुलातून…

छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहाराच्या वादातून सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे यांच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: 50 लाखांच्या व्यवहारातून थरार! आधी खणला खड्डा, मग प्राध्यापकावर त्यांच्याच पिस्तुलातून…

विजय चिडे प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी प्राध्यापकाचा खून करून तो प्रकार लपवण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे.

मृत प्राध्यापकांचे नाव राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विभागप्रमुख (HOD) म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होते. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मृतक आणि आरोपींमध्ये सुमारे 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गेवराई तांड्याजवळ JCB चालकाकडून दोन खड्डे खोदून घेतले होते. त्यानंतर दौलताबाद परिसरात तिघांनी पार्टी केली आणि महिलांनाही बोलावण्यात आले होते.

हेही वाचा: Buldhana Market Fire: बुलढाणा हादरलं! पेट्रोल पंपाजवळ आगीचा थरार; चिखलीतील बॉम्बे मार्केटमधील 9 दुकाने जळून खाक

दरम्यान, पैशांच्या वादातून आरोपी आणि राजाराम लोंढे यांच्यात वाद झाला. यावेळी लोंढे यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातूनच त्यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.

खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह एक दिवस गाडीत ठेवला. त्यानंतर गेवराई तांड्याजवळ आधीच खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरण्यात आला. नंतर JCB च्या मदतीने तो खड्डा व्यवस्थित बुजवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

खून केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचा बनाव केला. मृत राजाराम लोंढे यांचा मोबाईलही वारंवार ऑन-ऑफ करण्यात आला. तसेच त्यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडल्याची खोटी माहिती देण्यात आली.

हेही वाचा: Kamakhya Temple In Nashik: आसामनंतर आता नाशिकमध्ये घुमणार कामाख्या मातेचा जयजयकार; निफाडमध्ये साकारतंय देशातील दुसरं भव्य मंदिर

या प्रकरणी 6 फेब्रुवारी 2026 रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी तपासादरम्यान संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

दोघांची स्वतंत्र चौकशी केल्यानंतर विरोधाभासी माहिती समोर आली आणि पोलिसांचा संशय बळावला.यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता खुनाचा संपूर्ण प्रकार उघड झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number