राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची कृतीदलाची (टास्क फोर्स)ची बैठक पार पडली. मागील काही दिवसांपासून राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी कृतीदलाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले, कृतीदलाच्या बैठकीत कोरोनाच्या स्थितीवर चर्चा झाली असल्याचे सांगितले. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध आणावेत याबाबत मुख्यमंत्री आज किंवा उद्या अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून एका दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत आहे. हे चिंताजनक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी टाळण्याच्यादृष्टीने योग्य निर्णय घेण्यात येणार असल्यची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत गुरूवारी ३ हजार ६७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाण्यात ८२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी ५ हजाराहून अधिक झाली आहे.