जे. जे. रुग्णालयात डीनच्या छळाला कंटाळून राजीनामे

जे. जे रुग्णालयातील सुमारे 750 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. माजी डीन डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणी डॉ. लहाने यांच्यासह आणखी नऊ डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचं समोर आलंय. आजपासून काम बंद आंदोलन सुरु जे. जे. रुग्णालयात नेत्रविकार विभागात विभाग प्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक हे […]

जे. जे. रुग्णालयात डीनच्या छळाला कंटाळून राजीनामे

जे. जे रुग्णालयातील सुमारे 750 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. माजी डीन डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणी डॉ. लहाने यांच्यासह आणखी नऊ डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचं समोर आलंय.

आजपासून काम बंद आंदोलन सुरु

जे. जे. रुग्णालयात नेत्रविकार विभागात विभाग प्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांच शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. जे. जे मार्डने आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले. आम्हाला चौकशीसाठी न बोलवताच एकतर्फी रिपोर्ट पाठवला, असं डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तात्याराव लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रुग्णसेवा सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाकडून आली आहे.

डीनच्या छळाला कंटाळून राजीनामा

विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपामुळे व्यथित होऊन आणि डीनच्या छळाला कंटाळून राजीनामा दिल्याचे डॉ. लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी राजीनामे दिल्याचं सांगितलं आहे. माजी डीन डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, आमच्याकडे सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करायला दिल्या जात नाही. त्यामुळे २२ मे रोजी अधिष्ठातांकडे तक्रार देखील केली, अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. ३० वर्षं काम करणाऱ्या लोकांवर विश्वास न ठेवता सहा महिन्यांपूर्वी आलेल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून अधिष्ठात्यांनी त्यांची चौकशी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number