शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थान मधील वाद आता विकोपाला गेला.शिर्डीतील रहिवाशांनी साईमंदिरावर दंडुके मोर्चा काढला. साई संस्थान शिर्डी विकासासाठी निधी न देता राज्यात इतत्र निधी वितरीत करत असस्याने या विरोधात साई संस्थानेच्या बैठकी वेळी निवदेन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना अडविल्याने गोंधळ उडुन ग्रामस्थांन कडुन अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. दुसरीकडे काँग्रेसच्या एका असंतुष्ट गटाने हा हल्ला केल्याचं सांगत हावरे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
शिर्डीतील स्थानिकांनी यावेळी दंडुके घेऊन साई मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून यावेळी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
शिर्डीत साईबाबांच्या दान पेटीत आलेल्या पैशाच्या विनीयोगावरुन नेहमीच वाद सुरु राहीेले आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतांना शिर्डी विमानतळाला पैसे देण्यावरुनही वाद झाला होता.
त्यावेळी भाजपा सेनेच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध करत साई संस्थानला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडले होते.
मात्र, आता गेल्या काही दिवसापासुन काँग्रेस विरुध्द भाजप असाच गटातटाचा सामना शिर्डीत बघावयास मिळत आहे.
साई समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाने तीन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा केला. गेल्या एक वर्षात यात सरकारने एक छदामही दिला नाही, त्यात मोदींच्या हस्ते साई समाधी शताब्दी वर्षाचा समोरोप करुन वाहवाही मिळवुन घेतली तर दुसरीकडे शिर्डीतील अनेक विकासकामे ठप्प असतांना भाजपाच्या कोट्यातुन आलेल्या या विश्वस्त मंडळाने विदर्भातील रुग्णालयासाठी पंच्चातर लाखाचा निधी देवु केला. त्यात काही दिवसापूर्वी ठराव करत आता मुख्यमंत्री सहायत्ता निधीत पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्याचं ठरवलं आहे.
शिर्डीचा विकास करा आणि नंतरच शिर्डी बाहेर पैसै घेवुन जा अशी मागणी करत आज साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकी ठिकाणी शिर्डीतील काही ग्रामस्थ गेले असता त्यांना पोलीस बंदोबस्त लावून अडवण्यात आले. यावेळी हातात रुम्हणे घेवुन गेलेल्या गावकऱ्यांची येथे पोलीस आणि संस्थानच्या सुरक्षा रक्षकात बाचाबाची झाली आणि त्यात काही लोकांनी अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीवर हल्ला करत गाड्याच्या काचा फोडल्या.
साईबाबा संस्थानचे अध्यध्य सुरेश हावरे यांनी मात्र या गोंधळानंतर शिर्डीतील काँग्रेसचा एक असंतुष्ट गट आज दादागीरी करत असून त्यांना दंगल माजवायची होती. यातील काही लोकांनी स्वस्तात घेतलेल्या जमिनी महागात साई संस्थानला विकायच्या होत्या. त्या न घेतल्याने नैराशातुन त्यांनी हा हल्ला केल्याची टिका केली जात आहे. शिर्डीतील भाजपा पदाधिकार्यांही या घटनेचा निषेध केला.
शिर्डीत साईभक्तांनी दान केलेला पैसा आधी शिर्डीतच साईभक्तांच्या सुविधेसाठी वापरण्यात यावा अशी कायद्यात तरतुद आहे. दुसरीकडे शिर्डीतील साई संस्थानचा टर्न ओव्हर आता वार्षिक पाचशे कोटी वर पोहचला यातील काही पैसा शिर्डीत वापरुन काही पैसा राज्यात वितरित करण्यासाठी साई संस्थान वापरत आहे, मात्र दुसरीकडे शिर्डीत आज विकास कामे धिम्या गतीने होत आहेत.
साई संस्थानच्या रुग्णालयांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. यामुळे साईच्या झोळीतील पैसा आधी शिर्डीत वापरावा हे म्हणणेही अयोग्य ठरणार नाही. दुसरीकडे शिर्डीत देशभरातील भाविक येवून दान करतात त्यामुळे त्या दानातून देशातील गोरगरीब जनतेच्या भल्यासाठीही हा पैसा वापरला गेला पाहिजे हेही तितकंच खरं आहे. मात्र पैसा भक्तांचा आणि त्यावर आता राजकारण होवू लागलं ही मात्र दुर्दैव घटना आहे.