जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
देशातल्या प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर देण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न साकारण्यासाठी एक महत्वाची योजना आखण्यात आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहर गृहनिर्माण धोरणाअंतर्गत रेंट टू ओन ही योजना राबवली जाणार आहे.
लवकरच ही योजना केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली. या योजनेद्वारे विविध कारणांनी शहरात येणाऱ्या मंडळींना सरकारी संस्थेकडून भाड्याने घर घेता येणार आहे. तसंच कालांतराने ते घर सहजसोपे हप्ते भरून त्या व्यक्तीला घराचे मालकही होता येणार आहे.