मुंबई मेट्रोमधील ‘या’ स्थानकांचं नामांतर

‘मेट्रो २ अ’ च्या तीन स्थानकांचे अखेर नामांतरण करण्यात आले आहे. या मेट्रो मार्गामधील पहाडी गोरेगाव, वळनई आणि पहाडी एकसर या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकारणारने (एमएमआरडीए) यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. मेट्रो २ अ मार्गिकेतील पहाडी गोरेगाव स्थानकाचा परिसर वास्तवात बांगूरनगर जवळ असून त्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे या मेट्रो स्थानकाला बांगूरनगर […]

मुंबई मेट्रोमधील ‘या’ स्थानकांचं नामांतर

‘मेट्रो २ अ’ च्या तीन स्थानकांचे अखेर नामांतरण करण्यात आले आहे. या मेट्रो मार्गामधील पहाडी गोरेगाव, वळनई आणि पहाडी एकसर या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकारणारने (एमएमआरडीए) यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

मेट्रो २ अ मार्गिकेतील पहाडी गोरेगाव स्थानकाचा परिसर वास्तवात बांगूरनगर जवळ असून त्याच नावाने ओळखला जातो. त्यामुळे या मेट्रो स्थानकाला बांगूरनगर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेत पहाडी गोरेगाव या स्थानकाचे नामांतरण बांगूरनगर असे करण्यात आले आहे.

वळनई मेट्रो स्थानकाचा परिसर मीठचौकी या नावाने ओळखला जातो त्यामुळे वळनई स्थानकाचे नामांतरण मीठचौकी असे करण्यात आले आहे. तसेच, बोरिवली पश्चिमेला असलेले पहाडी एकसर हे स्थानक शिंपोली परिसरात आहे. त्यामुळे हे नाव बदलावे, अशी मागणी श्री ग्रामदेवी ग्रामस्थ मंडळाने केली होती. त्यानुसार पहाडी एकसर या स्थानकाचे नाव शिंपोली असे करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number