पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव

<br/>पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा ठराव विधानसभेत मंजूर

पुणे विमानतळाला ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव

पुणे: येथील लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याचा  शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला आणि त्यास तात्काळ मंजुरीही  देण्यात आली.  महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. 

पुणे (लोहगाव) आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे’ असे करण्याचा निर्णय राज्य सरकारने  झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता . यासंदर्भात  राज्य सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार होता. 

पुणे विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली होती. 

त्यानंतर आता पुणे येथील लोहगाव विमानतळाचे 'जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ', पुणे असे पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला आणि त्यास तात्काळ मंजुरीही  देण्यात आली.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number