नाशिक: अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यातच कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलदायक बातमी समोर आली होती. श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात घट करण्यात आली . 30 टक्क्यावरुन आयात शुल्क 10 टक्के करण्यात आले यामुळे नाशकात कांदा उत्पादक शेतकरी सुखावला . श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात घट करण्यात आली असून 30 टक्क्यावरुन आयात शुल्क 10 टक्के करण्यात आल्याने कांद्याची निर्यात वाढून याचा मोठा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे.
यातच आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करण्यात आलीय. कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी ही मागणी दादा भुसेंसह काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे केलीय. यासंदर्भात निर्यात शुल्क कमी न केल्यास दर पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. कांद्याला सध्या हजार ते दोन हजार रुपये सरासरी दर मिळत आहे तर दुसरीकडे निर्यात शुल्क कमी न केल्यास कांदा दर अजून कमी होण्याची भीती व्यक्त केली जातेय.
त्यामुळे आता निर्यात शुल्क हटवला तर कांदा निर्यात वाढेल आणि कांदा उत्पादन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी ही मागणी दादा भुसेंसह काही आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे केलीय. यासंदर्भात निर्यात शुल्क कमी न केल्यास दर पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे आता ही मागणी मान्य होणार कि नाही हे पाहणं महत्वाचं ठरणारे.