सुंदर केस कोणाला नको असतात? पण वयानुसार होणारी केसांची गळती हा एक चिंतेचा विषय आहे. पण या समस्येपासून तुम्ही घरगुती उपाय करून सुटका मिळवू शकता. केस गळण्याच्या समस्येवर मात कशी करता येईल पाहूया-
तांदळाचे पाणी
सहसा तांदूळ धुतल्यानंतर तांदळाचे पाणी आपण फेकून देतो. पण हे पाणी तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे ते पाणी फेकण्याऐवजी त्याने हळूहळू केस धुतल्याने केसगळती कमी होईल.
खोबरेल तेल
अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम केस हवेत नीट वाळवावेत. यानंतर त्यांना कोणत्याही तेलाने मसाज करावा. त्यातही केसांसाठी नारळाचं तेल हे अतिउत्तम मानलं जातं. यामुळे केस गळण्यापासून बचाव करण्यासाठी केसांना नारळाच्या तेलाचा मसाज करावा.
कडुनिंब
कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे ते केसगळती रोखण्याचे काम अतिशय उत्तमरित्या करते. याचा वापर करण्यासाठ आपल्या डोक्यातील केसगळती कमी करण्यासाठी कडुनिंबाची पावडर एका वाटीत घेऊन त्यात पाणी घालावे.त्यानंतर हे मिश्रण डोक्याच्या टाळूवर सोडा. साधारण ४० मिनिटांनी थोडेसे केस स्वच्छ धुवा.असे नियमित केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.