समीर वानखेडेंना दिलासा

मुंबई, १८ मे २०२३, प्रतिनिधी : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणात अंतरिम दिलासा दिला. हायकोर्टाने वानखेडेवर अटकेसह कोणत्याही कारवाईला २२ मे पर्यंत स्थगिती दिली आहे. याशिवाय वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास देखील सांगितले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने […]

समीर वानखेडेंना दिलासा

मुंबई, १८ मे २०२३, प्रतिनिधी : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणात अंतरिम दिलासा दिला. हायकोर्टाने वानखेडेवर अटकेसह कोणत्याही कारवाईला २२ मे पर्यंत स्थगिती दिली आहे. याशिवाय वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास देखील सांगितले आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी सीबीआयने आर्यन खानला गुरुवारी चौकशीसाठी बोलावले असताना ही सूचना देण्यात आली आहे. रिट याचिकेच्या आधारे वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये वानखेडे आणि एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील गप्पा समोर आल्या आहेत. आर्यन खानला जास्तीत जास्त दिवस एनसीबीच्या कोठडीत ठेवावे, अशी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच इच्छा असल्याचे उघड झाले आहे.

सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात समीर वानखेडेंनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोणत्या आधारावर सीबीआय माझी चौकशी करत आहे. माझ्या घराची झडती का घेण्यात आली. हा माझ्यावर अन्याय आहे, असा दावा वानखेडे यांनी याचिकेत केला होता. त्याची दखल घेत दिल्ली न्यायालयाने वानखेडेंची उद्या होणारी चौकशी थांबवली आहे. समीर वानखेडे यांनी २२ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. तोपर्यंत सीबीआयने त्यांची चौकशी करु नये, असे आदेश दिल्ली न्यायालयाने दिले. यास सीबीआयनेही संमती दर्शवली आहे. या आदेशाने वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number