बीडीडीच्या रहिवाशांना दिलासा, अखेर दुसऱ्या घराची अट रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात दुसऱ्या घराच्या अटीच्या मुद्यावरून निर्माण झालेला अडसर मंगळवारी अखेर दूर झाला. या चाळीतील रहिवाशांकडे चाळीत अथवा अन्यत्र कुठेही घर नसावे ही अट रद्द करण्याचा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग सुकर होणार आहे.   बीडीडी चाळीतील 160 चौरस फूटांची जागा अतिशय […]

बीडीडीच्या रहिवाशांना दिलासा, अखेर दुसऱ्या घराची अट रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात दुसऱ्या घराच्या अटीच्या मुद्यावरून निर्माण झालेला अडसर मंगळवारी अखेर दूर झाला. या चाळीतील रहिवाशांकडे चाळीत अथवा अन्यत्र कुठेही घर नसावे ही अट रद्द करण्याचा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यामुळे रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

 

बीडीडी चाळीतील 160 चौरस फूटांची जागा अतिशय अपुरी पडत असल्याने अनेक रहिवाशांनी अन्यत्र खोल्या घेतल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या घराच्या अटीच्या मुद्यावरून रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरुवात केली. कुटुंब वाढल्याने अनेकांनी अन्यत्र घरे घेतली आहेत. त्यामुळे कोणतेही हमीपत्र लिहून देण्यास रहिवासी तयार नव्हते.

 

परिणामी प्रकल्पाचे सर्व्हेक्षण, बायोमेट्रिक्स व इतर कामे रखडली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन यावर म्हाडाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.आणि रहिवाशांचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मान्य करून अट रद्द केली..त्यामुळे या दोन्ही चाळीतील असंख्य रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number