अनिल परबांना ४ जुलैपर्यंत दिलासा

मुंबई, ३० जून २०२३, प्रतिनिधी: मुंबई महापालिका अधिकारी मारहाण प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परबांना तुर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि अन्यकाही जणांवर ४ जुलैपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य सहाजणांनी अटकपूर्व जामिनासाठी […]

अनिल परबांना ४ जुलैपर्यंत दिलासा

मुंबई, ३० जून २०२३, प्रतिनिधी: मुंबई महापालिका अधिकारी मारहाण प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परबांना तुर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. परब आणि अन्यकाही जणांवर ४ जुलैपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य सहाजणांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

मंगळवारी मुंबई पोलिसंनी वाकोला पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीनं हे अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल केले गेले. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर सुनावणी पार पडणं अपेक्षित होतं. मात्र हे कोर्ट शुक्रवारी कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली.

परब यांच्या वतीने कोर्टात दावा केला गेला की, घटना घडली तेव्हा आपण तिथं हजर होतो. मात्र याचा अर्थ आपण त्यात सामील होतो, किंवा आपणही मारहाण केली असा त्याचा अर्थ होत नाही. याची नोंद घेत तुर्तास कोर्टानं परब यांच्यासह इतरांना मंगळवारपर्यंत अटकेपासूनचा अंतरिम दिलासा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number