Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील पाणीकपातीवरून PMC ने घेतला मोठा निर्णय, आता….

खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही घोषणा केली.

Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील पाणीकपातीवरून PMC ने घेतला मोठा निर्णय, आता….

Pune Water Supply Update : पुणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात अखेर पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही घोषणा केली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी अडचणींचा सामना करणाऱ्या पुणेकरांची मोठी चिंता आता मिटली आहे.

खडकवासला धरण साखळी पूर्ण भरली 
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून टेमघर धरण देखील ९८ टक्क्यांपर्यंत भरले आहे. धरणांमधील या मुबलक जलसाठ्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आता पूर्ववत व नियमित सुरू ठेवणे शक्य झाले आहे. दरम्यान, मनसे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दोन दिवसांपूर्वीच पालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली होती.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Meeting Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे धडाकेबाज निर्णय; शेतकरी, न्यायव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा

अपुऱ्या पावसाने सुरू झालेली कपात अखेर संपुष्टात 
जूनच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे धरण क्षेत्रातील साठा घटला होता, परिणामी १५ जूनपासून महापालिकेने शहरात पाणीकपात लागू केली होती. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील स्थिती सुधारली. आषाढी वारीच्या काळात पाच दिवसांसाठी ही कपात तात्पुरती उठवण्यात आली होती. त्यानंतर २२ जुलै रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते, मात्र दीर्घकाळ कोणतीही अधिकृत भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता. आता अखेर पाणीकपात पूर्णपणे रद्द झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number