फक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा; स्वातंत्र्यदिनी रिलायन्सची धमाकेदार ऑफर

वृत्तसंस्था, मुंबई   एकीकडे देशभरात जिओने धुमाकुळ घातला असताना अनिल अंबानींच्या रिलायन्सने जिओला टक्कर देणारी धमाकेदार ऑफर आणली आहे.   फक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा अशी ही जबरदस्त ऑफर आहे. RCom चा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन असल्याचा दावा करण्यात येत आहे.    या नव्या प्लॅन अंतर्गत 365 दिवस म्हणजेच तब्बल वर्षभर अनलिमिटेड 2जी डेटा […]

फक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा; स्वातंत्र्यदिनी रिलायन्सची धमाकेदार ऑफर

वृत्तसंस्था, मुंबई

 

एकीकडे देशभरात जिओने धुमाकुळ घातला असताना अनिल अंबानींच्या रिलायन्सने जिओला टक्कर देणारी धमाकेदार ऑफर आणली आहे.

 

फक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा अशी ही जबरदस्त ऑफर आहे. RCom चा हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन असल्याचा दावा करण्यात

येत आहे. 

 

या नव्या प्लॅन अंतर्गत 365 दिवस म्हणजेच तब्बल वर्षभर अनलिमिटेड 2जी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. इतकच नाही तर डेटासह 56

रुपयांचा टॉकटाइमही मिळणार आहे.

 

रिलायन्स मोबाइलने ट्वीटरवरुन आपल्या या नव्या ऑफरची माहिती दिली.

 

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रिलायन्सनं हा नवा प्लॅन बाजारात आणला आहे.

 

रिलायन्स मोबाइलच्या वेबसाइटवर रिचार्ज केल्यावरच ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number