जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात, तर ही बातमी वाचून नक्कीचं, तुम्ही आनंदी व्हाल. 31 मार्च 2018 रोजी जिओची प्राईम मेंबरशीप संपणार होती. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न युझर्सच्या मनात होता. जिओच्या प्राईम युझर्सना आजपासून म्हणजे 31 मार्चपासून प्राईम ऑफर्सचा लाभ मिळत राहणार आहे. एका वर्षासाठी या मेंबरशीपची मुदत वाढवण्यात आली आहे, तशी घोषणा कंपनीने केली आहे.
जिओची प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी 99 रुपये मोजावे लागत होते. या ऑफरची मुदत 31 मार्चला संपत होती. मात्र जिओने या ऑफरची मुदत वाढवत 31 मार्च 2019 केली आहे. तर जिओचे नव्या युझर्सना 99 रुपयांमध्ये प्राईम मेंबरशीप मिळणार आहे.
जिओ प्राईम मेंबर्सना स्वस्त आणि स्पेशल टॅरिफ प्लॅन मिळतात तसेचं VoLTE सर्व्हिसमुळे मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. जिओ अॅपचा लाभ, 4 जी डाटा आणि एसएमएसची सुविधा हे सर्व लाभ पुढील वर्षापर्यंत मोफत मिळणार आहे.