इम्रान खान यांची सुटका

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी अटक करण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर इम्रान यांना अटक झाली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. परंतु आता इम्रान यांना पाक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सोडण्यात आले आहे. पाकिस्तानी रेंजर्सने मगंळवारी इम्रान यांना अटक केली होती. न्यायालयात दाखल होण्याआधीच […]

इम्रान खान यांची  सुटका

मुंबई, ११ मे २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे रोजी अटक करण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर इम्रान यांना अटक झाली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. परंतु आता इम्रान यांना पाक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सोडण्यात आले आहे.

पाकिस्तानी रेंजर्सने मगंळवारी इम्रान यांना अटक केली होती. न्यायालयात दाखल होण्याआधीच इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. इम्रान यांना अटक करताना न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे इम्रान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली होती. इम्रान खान यांच्या अटकेचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटत होते. इम्रान खान समर्थक आक्रमक झाले होते. ठिकठिकाणी इम्रान समर्थकांकडून जाळपोळ करण्यात आली. परंतु, गुरुवारी (११ मे) इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याची माहिती समोर आली. इम्रान खानला तात्काळ सोडण्याचे आदेश पाक सर्वोच्च न्यायालयाने दिले असून इम्रान याना सोडण्यात आले आहे. तसेच, शुक्रवारी (दि. १२ मे) इम्रान खान इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number