मिशन टी-1 कॅप्चर मोहीमेतून ‘त्या’ पाचही हत्तींची मुक्तता

नरभक्षक वाघिणीच्या बंदोबस्तासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत 5 हत्ती सहभागी करण्यात आले होते. मात्र यापैकी ताडोबामधून आणलेल्या हत्तीने बेफाम होऊन चहांद गावातील ‘अर्चना कुलसंगे’ या महिलेला ठार मारल्याने वनविभागाने या हत्तीला ताडोबाला परत पाठविले आहे. तसेच मध्य प्रदेशातून आणलेल्या पवन, शिव, हिमालय व विजय या 4 हत्तींना कॅम्पमधून वनविभागाच्या उमरी डेपोत हलविण्यात आले आहे. मध्यप्रदेशमधून […]

मिशन टी-1 कॅप्चर मोहीमेतून ‘त्या’ पाचही हत्तींची मुक्तता

नरभक्षक वाघिणीच्या बंदोबस्तासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत 5 हत्ती सहभागी करण्यात आले होते.

मात्र यापैकी ताडोबामधून आणलेल्या हत्तीने बेफाम होऊन चहांद गावातील ‘अर्चना कुलसंगे’ या महिलेला ठार मारल्याने वनविभागाने या हत्तीला ताडोबाला परत पाठविले आहे.

तसेच मध्य प्रदेशातून आणलेल्या पवन, शिव, हिमालय व विजय या 4 हत्तींना कॅम्पमधून वनविभागाच्या उमरी डेपोत हलविण्यात आले आहे.

मध्यप्रदेशमधून आणलेल्या 4 हत्तींनादेखील ऑपरेशनपासून दूर ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे.

मध्यप्रदेशमधील चारही हत्तींना बेस कॅम्पमधून हलवून उमरी येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे.

महत्वाचं म्हणजे गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या या मिशनमध्ये अजून एकदाही वाघीण वनविभागाच्या दृष्टीक्षेपास पडली नसल्याने या मिशन वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number