आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु

आरटीई प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे राज्यातील पालकांचे लक्ष लागले होते. शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना आज १ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करायचे आहेत. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला बुधवारी १ […]

आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु

आरटीई प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे राज्यातील पालकांचे लक्ष लागले होते. शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना आज १ मार्च ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करायचे आहेत. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला बुधवारी १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी १७ मार्चपर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली.

राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेत ८ हजार ८२७ शाळा असून, त्यामध्ये एक लाख १ हजार ९२६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मुंबई विभागातील पालिका अखत्यारीतील २७२ तर उपसंचालक अंतर्गत येणाऱ्या ६५ शाळांनी प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी केली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांनी https://student.maharashtra.gov.in/ या लिंकचा वापर करावा. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कादगपत्रांची माहिती आणि इतर सविस्तर माहिती आरटीईच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number