मुंबई, १९ मे २०२३, प्रतिनिधी : शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने एका महत्त्वपूर्ण आदेशात असे घोषित केले आहे की, नागरिकांनी ‘दोन हजाराचे लवकर सुटे करावेत’. हा आदेश अधिक काय सांगतो इथे वाचा,
१. दोन हजाराच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत सुट्या करून घ्या.
२. नोटा बदलण्यासाठी २३ मे पासून ३० सप्टेंबर इतकी मुदत
३. एका खातेदाराला एकावेळेस दोन हजाराच्या दहाच नोटा सुट्या करून मिळतील.
४. दोन हजाराच्या नोटांची अमर्याद रक्कम खातेदार बँकेत भरू शकतो.
५. दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद होत आहे.
६. रिझर्व्ह बँक २ हजाराच्या सर्व नोटा परत घेणार.
७. एकूण ३ लाख ६२ हजार कोटी रुपयांच्या नोटा परत येणे अपेक्षित