देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या होणार पुनर्विकास

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा विकास करण्यात येणार असून याचे भूमिपूजन उद्या रविवारी (दि ६) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा यात समावेश आहे. यात मुंबईतील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश […]

देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या होणार पुनर्विकास

मुंबई ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५०८ स्थानकांचा विकास करण्यात येणार असून याचे भूमिपूजन उद्या रविवारी (दि ६) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा यात समावेश आहे. यात मुंबईतील १५ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील एकूण १२३ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोणातून स्थानकांचा निरंतर विकास केला जाणार आहे. अमृत भारत स्थानक योजनेत मध्य रेल्वेची ७६ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्‍यात येणार आहे. त्यापैकी ३८ स्थानकांचे भूमिपूजन होणार आहे. या अमृत भारत स्थानक योजनेमध्ये स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आराखडा तयार करणे आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. स्थानकात प्रवेश सुकर करणे, स्थानक परिसर क्षेत्र्त्राचा विकास, प्रतीक्षालय( वेटिंग रूम), स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्कलेटर, स्वच्छता व्यवस्था, मोफत वाय -फाय, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्र, यांचा यामध्‍ये समावेश आहे.

प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन ‘एक स्थानक एक उत्पादन’, प्रवाशांना माहिती देण्यासाठी उत्तम प्रणाली, ‘एक्झिक्युटिव्ह लाउंज’, व्यवसायिक बैठकीसाठी निश्चित जागा, स्थानकाच्या सौदर्यामध्‍ये भर घालणारी रचना अशा विविध योजना राबविण्‍यात येणार आहेत. या योजनेत इमारतीमध्‍ये सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकावर येणे सुकर जावे यासाठी सुविधा केली जाईल. ‘मल्टीमॉडल इंटिग्रेशन’, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, येण्‍या- जाण्‍यासाठी प्रशस्त ट्रॅकची तरतूद केली जाणार आहे; तसेच आवश्यकतेनुसार ‘रूफ प्लाझा’ तयार करण्यात येणार आहेत. स्‍थानक सुधारणा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने आणि व्यवहार्यता लक्षात घेवून, दीर्घकालीन उपक्रम म्हणून राबविण्‍यात येणार आहे.

अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभाग – भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा रोड, सँडहर्स्ट रोड या स्थानकांचा विकास केला जाणार आहे. तर पुणे विभागातील कोल्हापूर, हडपसर, चिंचवड, सातारा, सांगली, कराड, तळेगाव, हातकणंगले, आकुर्डी, बारामती, देहूरोड, केडगाव, उरुळी, लोणंद, वाठार, फलटण या स्थानकांचा विकास होणार आहे.

नागपूर विभागात बल्हारशाह, बैतूल, चंद्रपूर, सेवाग्राम, पुलगाव, धामणगाव, अमला, नरखेल, काटोल, पांढुर्णा, जुन्नरदेव, हिंगणघाट, मुलताई, घोराडोंगरी, गोधनी तर भुसावळ विभागात बडनेरा, मलकापूर, मूर्तिजापूर, नेपानगर, शेगाव, देवळाली, मनमाड, नांदुरा, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळे, लासलगाव, रावेर, सावदा या स्थानकांचा विकास केला जाणार आहे. सोलापूर विभागातील सोलापूर, कलबुर्गी, दौंड, पंढरपूर, वाडी, कुर्डुवाडी, अहमदनगर, कोपरगाव, लातूर, शहाबाद, बेलापूर, गंगापूर रोड, दुधनी, उस्मानाबाद, जेऊर स्थानकांचा विकास केला जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number