Delhi Blast Updates : दिल्ली स्फोटात पाकिस्तानाचाच हात, आत्मघातासाठी पाक हँडलरकडून उमरचं ब्रेनवॉश

नूंहमधील हिदायत कॉलनीत त्याला खोली देणारी महिला एनआयएने ताब्यात घेतली आहे. अल फलाह यूनिव्हर्सिटीतील संशयास्पद सवलतींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Delhi Blast Updates : दिल्ली स्फोटात पाकिस्तानाचाच हात, आत्मघातासाठी पाक हँडलरकडून उमरचं ब्रेनवॉश

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार ब्लास्टप्रकरणी तपासात दोन महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंड डॉक्टर उमर मोहम्मद याबाबत नवी माहिती समोर आली आहे. त्याचसोबत, नूंह येथील हिदायत कॉलनीमध्ये डॉक्टर उमर नबीसाठी खोली उपलब्ध करून दिल्याच्या आरोपावरून एका महिलेला एनआयएने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. अनेक दिवसांपासून एजन्सी नूंहमध्ये तपास करत होती. अजूनही या प्रकरणात अनेकजण तपासाच्या चौकटीत आहेत. अधिकृत पुष्टी नसली तरी सूत्रांनी सांगितले की सुमारे 35 वर्षांची ही महिला सोमवार रात्री पकडली गेली. तिचा विवाह राजस्थानमध्ये झाला आहे.

पहिल्या मोठ्या खुलाशानुसार, डॉक्टर उमरने लाल किल्ल्याजवळ स्फोट करण्यापूर्वी आपल्या खोलीत सुमारे एक मिनिट 20 सेकंदांचा एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ ऑक्टोबर रोजी तयार केल्याचे मानले जाते. मंगळवारी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिसून आले की उमर इंग्रजीत सहज बोलत होता. अधिकार्‍यांच्या मते त्याचे संपूर्ण ब्रेनवॉश पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या हँडलरने केले होते. व्हिडिओमध्ये त्याच्या चेहर्‍यावर कोणतीही भीती किंवा तणाव दिसत नाही, म्हणजेच त्याची आत्मघाती हल्ला करायची पूर्ण तयारी होती.

हेही वाचा: America Saudi Arabia Deal: आधी थेट नकार, मग अचानक हिरवा कंदील! सौदी–अमेरिका डीलमुळे भारताला मोठा धक्का

दुसरा खुलासा असा आहे की, उमारसोबत काम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, वर्ष 2023 मध्ये तो जवळपास सहा महिने अचानक गायब झाला होता. त्या दरम्यान तो कुठे होता याची कुणालाच माहिती नव्हती. यूनिव्हर्सिटीनेदेखील त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. सहा महिन्यांनंतर तो पुन्हा रुग्णालयात आला आणि आपले काम सुरू केले. त्याच्या बॅचमेट डॉक्टरांनाही त्याच्या येण्या-जाण्याबद्दल काहीच माहिती नसायची. अल फलाह यूनिव्हर्सिटीने डॉक्टर उमरला दिलेल्या सवलतींविषयीही प्रश्न निर्माण झाले आहेत. जर यूनिव्हर्सिटीचा कोणत्याही टेरर मॉड्यूलशी संबंध नव्हता, तर उमरला इतकी मोकळीक का दिली जात होती?

येथे अप्रेंटिस करणाऱ्या दोन डॉक्टरांनी सांगितले की उमर आठवड्यात फक्त एक-दोन क्लास घ्यायचा आणि तेही 15 ते 20 मिनिटांचे. रुग्णालयात त्याला नेहमी संध्याकाळ किंवा रात्रपाळी दिली जायची. या वेळातही तो वारंवार अनुपस्थित राहायचा. रुग्ण आल्यावर फोन करून त्याला बोलवावे लागायचे. काही मिनिटे थांबून तो पुन्हा आपल्या खोलीत जात असे. या प्रकरणातील दुसरा आरोपी आमिर राशिद अली देखील एनआयएच्या ताब्यात आहे. न्यायालयाने त्याला 10 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. त्याच्या सरकारी वकिलाने सांगितले की आमिरच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप आहे, ना कोणतीही भीती. त्याने कबूल केले की स्फोटात वापरलेली कार त्याच्याच नावावर होती.

अल फलाह यूनिव्हर्सिटीमध्ये तपास वाढल्यानंतर अनेक कर्मचारी सुट्टी घेऊन घरी जाताना दिसले. विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये याचा परिणाम स्पष्ट दिसत असून ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या 200 वरून 100 पेक्षा कमी झाली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

हेही वाचा: Maharashtra Cold Wave: महाराष्ट्रात थंडीचा कहर! 14 जिल्ह्यांना IMDचा तीव्र थंडीचा इशारा; पारा 7 अंशांखाली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number