देशातल्या ५ राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट

देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तर मंगळवारी थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. धुळ्यात अक्षरशः थंडीची लाट पसरल्याचं पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर धुळ्यात चांगलाच वाढला असून, आज धुळ्यात ५.५ अंश […]

देशातल्या ५ राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट

देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तर मंगळवारी थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. धुळ्यात अक्षरशः थंडीची लाट पसरल्याचं पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर धुळ्यात चांगलाच वाढला असून, आज धुळ्यात ५.५ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीये. थंडीची लाट पसरल्यामुळे सकाळी रस्ते निर्मनुष्य असल्याचं पाहायला मिळालं.

देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर ढगाळ वातावरण जाणवत आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील दोन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता

महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, सलंग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

कुठे किती किमान तापमान?

जळगाव – ५
औरंगाबाद – ५.७
पुणे – ८.६
नागपूर – ८.५
परभणी – ९.५
सातारा – ११.९
नांदेड – १०.६
उदगीर – १०.३
महाबळेश्वर – ११.१
जालना – ११
सांगली – १३.१
सोलापूर – १२
कुलाबा – २२
रत्नागिरी – १९.५
डहाणू – १७.३
नाशिक – ८.७
मालेगाव – १२.४
कोल्हापूर – १५

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number