यंदाच्या हिवाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक थंडी

उत्तरेकडील थंड वाऱ्याने मध्य प्रदेशात थंडीची लाट आणली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. 

यंदाच्या हिवाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक थंडी

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात मागील आठवड्यापासून घसरत चाललेल्या तापमानाने रविवारी विक्रम नोंदविला. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी आणि एक आकडी म्हणजेच ८.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सूर्य डोक्यावर येण्याच्या सुमारास वातावरणातील हुडहुडी कमी झाली.उत्तरेकडील थंड वाऱ्याने मध्य प्रदेशात थंडीची लाट आणली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. 

ता. नऊ डिसेंबरपासून तापमानात झपाट्याने घट होत आहे. नऊ तारखेला किमान तापमान १२. ७ अंश होते. ते कमी होत १३ तारखेपर्यंत १२.२ अंशांपर्यंत खाली गेले. त्यानंतर पाराअचानक खाली आला असून, शनिवारी १०.२ अंश तापमान नोंदले गेले. मात्र, रविवारी तापमानाने रेकॉर्ड ब्रेक करत ८.८ अंशाची पातळी गाठल्याने अवघे शहर थंडीने काकडत आहे. शनिवारी रात्रीपासून शहराला भरलेली हुडहुडी रविवारी सकाळी अकरापर्यंत कायमच होती. मध्यान्हीचा सूर्य डोईवर आल्यावर ही हुडहुडी काहीशी कमी झाली. मात्र, बोचऱ्या वाऱ्याने हा दिलासाही घालवून टाकला. दरम्यान, हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोलीसह महाराष्ट्रातील काही शहरांना थंडीच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. आगामी २४ तासांत तापमान आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 थंडीत घ्यावयाची काळजी ? 

  • तापमानानुसार कपडे घ्या: थंडीला तोंड देण्यासाठी उबदार आणि हलके कपडे वापरा. ऊन लागले तरी उबदार कपड्यांची सोय करा.
  • स्वच्छ आणि कोरडे पाऊस: पाऊस किंवा ओले कपडे झटकून लगेच बदलून घ्या, ज्यामुळे शरीरात थंडी येणार नाही.
  • तूप किंवा तळणीचं तेल वापरा: शरीरावर तूप किंवा तेल लावल्याने उब येते आणि त्वचा चांगली राहते.
  • गरम पेये प्यावा: गरम चहा, कॉफी किंवा दूध पिऊन शरीरात उष्णता ठेवा.
  • थंडीच्या हवेपासून वाचवा: घराच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी थंड हवेमध्ये बाहेर जाण्याची टाळा.
  • विटामिन सी आणि पोषण: सर्दी-जुखाम टाळण्यासाठी हंगामी फळे आणि भाज्या खा.
  • शारीरिक सक्रियता: हलका व्यायाम करा किंवा चालायला जा. त्याने शरीराची उष्णता राखली जाते.
  • उबदार तास: रात्री लवकर झोपा आणि गरम बिछाना वापरा.
  • हात-पाय उबदार ठेवा: उबदार मोजे आणि हातमोजे घालून शरीराची उब टिकवा.
  • शुद्ध हवेचा वापर: घराच्या आत हवा स्वच्छ ठेवा, ओलसरपणा आणि धुरापासून दूर राहा. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number