लवकरच बाजारात साडेतीनशे रुपयांचे नाणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रिझर्व्ह बँक साडेतीनशे रुपयांचे नवीन नाणे चलनात आणणार आहे. शीखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त हे विशेष नाणे सादर करण्यात येणार आहे. गुरु गोविंद सिंग यांचा हा जयंती उत्सव 30 डिसेंबर 2016 ते पाच जानेवारी 2017 दरम्यान तख्तश्री पाटणासाहिब येथे साजरा करण्यात आला होता. या विशेष नाण्याचे वजन […]

लवकरच बाजारात साडेतीनशे रुपयांचे नाणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रिझर्व्ह बँक साडेतीनशे रुपयांचे नवीन नाणे चलनात आणणार आहे. शीखांचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त हे विशेष नाणे सादर करण्यात येणार आहे. गुरु गोविंद सिंग यांचा हा जयंती उत्सव 30 डिसेंबर 2016 ते पाच जानेवारी 2017 दरम्यान तख्तश्री पाटणासाहिब येथे साजरा करण्यात आला होता.

coin-850.jpg

या विशेष नाण्याचे वजन 34.65 ग्रॅम ते 35.35 ग्रॅमच्या दरम्यान असणार असून, त्यासाठी चांदी, तांबे, निकेल आणि जस्ताचा वापर करण्यात येणार आहे. नाण्याच्या एकूण वजनापैकी 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्ताचे प्रमाण असणार आहे.

नाण्याच्या समोरच्या बाजूवर अशोकचिन्हाची प्रतिकृती असून, त्याखाली ‘सत्यमेव जयते’ची मुद्रा अंकित करण्यात येणार आहे. याच बाजूला मधोमध रुपयाचे चिन्ह आणि 350 हा आकडा असणार आहे. नाण्याच्या एका बाजूला इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ आणि दुसऱ्या बाजूला देवनागरीमध्ये ‘भारत’ असे मुद्रित करण्यात येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number