जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. अखेर साडे चार वर्षांनी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने ही वाढ केली आहे.
या समितीने आरबीआय ज्या दरानं बँकांना वित्तपुरवठा करतं त्या व्याजाचे दर किंवा रेपो रेट पाव टक्क्यांनी वाढवून 6.25 टक्के केला आहे.
बँका ज्या दरानं आपल्याकडे असलेला अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर (म्हणजे रिव्हर्स रेपो) त्यांना 6 टक्के व्याज मिळेल. एप्रिल महिन्यामध्येच दोन सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती.
आज झालेल्या बैठकीमध्ये सर्वच्या सर्व सदस्यांनी दरवाढीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं व एकमतानं ही वाढ करण्यात आली आहे.या दरवाढीमुळे भविष्यातील सर्व कर्जांचे दर वाढू शकतात. परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे यांचे दर वाढण्याची शक्यता आहे.