केंद्र सरकारकडून जिल्हा बँकांना दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केंद्र सरकारकडून जिल्हा बँकांना दिलासा मिळाला. जिल्हा बँका आणि पोस्ट ऑफिसमधल्या जुन्या 500 आणि हजारच्या नोटा आरबीआय स्वीकारणार आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी जिल्हा बँकांना 30 दिवसांची मुभा देण्यात आली आहे.   अर्थ मंत्रालयानं याबाबत नोटिफिकेशन जारी केलं. रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा […]

केंद्र सरकारकडून जिल्हा बँकांना दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्र सरकारकडून जिल्हा बँकांना दिलासा मिळाला. जिल्हा बँका आणि पोस्ट ऑफिसमधल्या जुन्या 500 आणि हजारच्या नोटा आरबीआय स्वीकारणार आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी जिल्हा बँकांना 30 दिवसांची मुभा देण्यात आली आहे.

 

अर्थ मंत्रालयानं याबाबत नोटिफिकेशन जारी केलं. रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असं अर्थमंत्रालयानं म्हटलं. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणंही बँकांना कठीण झालं. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number