मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य राऊतांना भोवलं

शिवसेनेचं पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात नाशिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या […]

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य राऊतांना भोवलं

शिवसेनेचं पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचले आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणी राऊत यांच्याविरोधात नाशिक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्या प्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शिसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्याच राजकारणाला कलाटणी मिळाली. सध्या संपूर्ण राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे.

‘माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत’, असाही आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number