राऊतांचा दादा गटावर निशाणा

 मुंबई , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अजितदादा गटाकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो सर्रासपणे वापरला जात आहे. त्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. पवार यांनी आपला फोटो लावू नका, नाहीतर मी कोर्टात जाईन, असा इशाराच अजितदादा गटाला दिला आहे. त्यावर पवार आमचे गुरू आहेत. आम्ही त्यांचे फोटो लावणारच, असे अजितदादा गटाने म्हटले आहे. […]

राऊतांचा दादा गटावर निशाणा

 मुंबई , १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अजितदादा गटाकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो सर्रासपणे वापरला जात आहे. त्यावर शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. पवार यांनी आपला फोटो लावू नका, नाहीतर मी कोर्टात जाईन, असा इशाराच अजितदादा गटाला दिला आहे. त्यावर पवार आमचे गुरू आहेत. आम्ही त्यांचे फोटो लावणारच, असे अजितदादा गटाने म्हटले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जुंपण्याची शक्यता आहे. आता या वादात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. शरद पवार यांना दैवत म्हणता आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसता. हे ढोंग आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे सांगत असतानाच राऊत यांनी एका बड्या नेत्यावर नाव न घेता टीका केली आहे.

शरद पवार यांनी त्यांचा फोटो लावण्यास अजितदादा गटाला मज्जाव केला आहे. त्यासंदर्भाने बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना फुटीचा दाखला दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना फोटो न लावण्यास सांगितलं होतं. त्याचा दाखला देत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत कुणाला तरी इशारा दिला होता. माझा फोटो वापरू नका. तुम्ही माझ्यापासून दूर गेला. माझा विचार तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही दूर गेला ना, मग माझा फोटो वापरू नका, असं बाळासाहेब म्हणाले होते, असे सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

शरद पवार यांच्यापासून लोक फुटून गेले. तरीही म्हणतात शरद पवार आमचे नेते आहेत. शरद पवार आमचे गुरू आहेत. हे ढोंग आहे. तुम्ही स्वत:चा पक्ष स्थापन करा. तुम्ही तुमचे फोट लावून मते मागा. तुम्हाला शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे का हवेत? तुमच्यात धमक नाही का?, असा सवाल त्यांनी अजितदादा आणि शिंदे गटाला केला. शरद पवार आमचे दैवत आहेत, असं हे लोक म्हणत आहेत. मग दैवताच्या पाठीत खंजीर का खुपसला? बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही का फोडली? डरपोक लोकांचे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number