पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावली असून गुरुवारी याप्रकरणी सुनावणी झाली. दरम्यान, संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ झाली असून 8 ऑगस्टपर्यंत राऊतांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांना दिलासा मिळालेला नाही. संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार ईडीने […]
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावली असून गुरुवारी याप्रकरणी सुनावणी झाली. दरम्यान, संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ झाली असून 8 ऑगस्टपर्यंत राऊतांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांना दिलासा मिळालेला नाही.
संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार ईडीने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यामुळे गुरुवारी राऊतांना न्यायालयात हजर करण्यात आले. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीने न्यायालयात केला. त्यामुळे संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळेची मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सनुावणी पार पडली असून न्यायालयाने राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे. तसेच पुढील आठवड्यात राऊतांना चौकशीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.