महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील घडामोडींनी तूर्तास प्रचंड वेग धरला आहे. उद्धव गटाचे संजय राऊत सातत्याने करत असलेली वक्तव्येदेखील वादग्रस्त ठरताना दिसत आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीसांनी राऊत करत असलेल्या वक्तव्यावर चांगलाच पलटवार केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचारासाठी गुरुवारपासून चार दिवस कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या प्रचारासाठीचा हा त्यांचा दुसरा दौरा असून भाजपाचे नेतेदेखील या अखेरच्या प्रचारासाठी जाणार आहेत. तर, भाजपचे प्रमुख मंत्री आणि नेते प्रचारात जोर लावणार आहेत. यावेळी ‘संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली थांबवावी’ असा पलटवार फडणवीसांनी राऊतांवर केला आहे.