जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद हा आता राज्यपालांच्या कोर्टात पोहोचला आहे. कोकणात भविष्यात रिफायनरी करु अशा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर रिफायनरी विरोधी समिती राज्यपालांना भेटणार आहे.
कोकणातील नागरीकांनी नाणार प्रकल्पाला 95 टक्के असहमती दाखवली होती. नाणार प्रकल्पामुळे तिथल्या अनेक नागरीकांने आपल्या जमिनींना गमवाव लागणार आहे. तेथील रहीवाशांनी अनेकदा अपल्या समस्या प्रशासनापुढे मांडून देखील हा प्रकल्प त्यांच्यावर लादला जातोय असं त्याचं म्हणन आहे. तसा लोकांनी त्याचा आक्रोशही दर्शवला आहे.
प्रकल्पाला 95 टक्के असहमती दाखवली असताना प्रकल्प का लादला जातोय? असा सवाल रिफायनरी विरोधी समितीने सादर केलाय. तसंच भविष्यातही हा रिफायनरीचा प्रकल्प होवू देणार नाही असा निर्धार प्रकल्प विरोधी समितीने केलाय. त्यांच्या अशा निर्णयावर आता मुख्यमंत्र्यांची काय भूमीका असेल हे पाहाण गरजेच ठरेल.