जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी या गावात शुक्रवारी रात्री दोन वाजता बिबट्यांने तीन जणांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये गणपत सुवरे, रामचंद्र सुवरे आणि तुकाराम शिवगण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री त्यांना तातडीने साखपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये गणपत सुवरे यांच्या डोक्याला, खांद्याला आणि हाताला जखमा झाल्या आहेत तर, तुकाराम शिवगण यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
याप्रकरणी वनविभागाने गावाला भेट देऊन पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे.