रत्नागिरी जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन शिरीष मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. चिपळूण येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकल्या आहेत.
गर्भपाताच्या गोळ्यांचे किट देण्यासाठी 4,500 रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एका सुशिक्षित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अवघ्या सहा तासांच्या आत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. वैद्यकीय क्षेत्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील परिचित नाव असलेल्या डॉ. कांचन मदार यांना लाचेची उर्वरित रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येताच जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे.