आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत बचावलेले अधिकारी प्रकाश सावंत देसाई यांची बदली करण्यात आली आहे.
अपघातानंतर त्यांच्या विरोधात मृतांचे नातेवाईक आणि सर्वपक्षीय नेत्यांचा उद्रेक पाहायला मिळाला होता.
प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी आणि सीआयडी चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती.
नातेकाईकांचा आक्रोश पाहुन आता विद्यापीठ प्रशासनानं रत्नागिरीमधील मत्स्य महाविद्यालयात प्रकाश सावंत देसाई यांची बदली केली आहे.