रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गांवर उक्षी टनेल मध्ये मडगांवाकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा प्रकार घडला असून , रत्नागिरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उक्षी टनेल येथे पहाटे राजधानीचे इंजिन घसरले. ही दुर्घटना घडल्यानंतर “कोकण रेल्वे अधिकारीही लाइन मोकळी करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.”
पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्यामुळे प्रवाशांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गाडीचे काही डबे टनेल मध्येच होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने हालचाली केल्या.
दरम्यान, या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी स्थानकात कोचीवली एक्सप्रेस तसेच भोके येथे सीएसटीएम कडे जाणारी, चिपळूणला नागकोईल एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस खेडला तर मंगला एक्सप्रेस वैभवावाडीला थांबवून ठेवण्यात आली होती. या मार्गांवर अजून काही तास वाहतूक ठप्प राहणार आहे.