Rantagiri Accident : दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं; दुचाकी नाल्यात कोसळून नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड मार्गावरील महाळुंगे येथे घडलेल्या भीषण दुचाकी अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून समाजसेवेची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या 22 वर्षीय सेजल भागवत हिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची लहानपणापासूनची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत अहिरे जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी नर्सिंगचा शेवटचा […]

Rantagiri Accident : दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं; दुचाकी नाल्यात कोसळून नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड मार्गावरील महाळुंगे येथे घडलेल्या भीषण दुचाकी अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून समाजसेवेची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या 22 वर्षीय सेजल भागवत हिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची लहानपणापासूनची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत अहिरे जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी नर्सिंगचा शेवटचा पेपर दिल्यानंतर दोघीही आनंदाने दुचाकीवरून घरी परतत होत्या. मात्र महाळुंगे परिसरात त्यांची दुचाकी अचानक घसरली आणि रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या भीषण अपघातात सेजल भागवत हिला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला, तर वैष्णवी अहिरे जखमी झाली.

हेही वाचा : Amravati Accident: अमरावतीत भीषण अपघात! राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची धडक; दोन युवतींचा जागीच मृत्यू

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number