Ration Card: धान्य कमी मिळतंय की पूर्ण? आता रेशन कार्डधारकांना दरमहा मिळणाऱ्या धान्यावर ठेवता येणार लक्ष; कसं?

रेशनकार्डमुळे शासनातर्फे कमी दरात धान्य खरेदी करता येते. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळते, मात्र हे धान्य दरमहा किती मिळायला हवे? नेमके किती मिळते? याची दरमहा मोजणी आता लाभार्थ्यांना देखील

Ration Card: धान्य कमी मिळतंय की पूर्ण? आता रेशन कार्डधारकांना दरमहा मिळणाऱ्या धान्यावर ठेवता येणार लक्ष; कसं?

रेशनकार्डमुळे  शासनातर्फे कमी दरात धान्य खरेदी करता येते. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य मिळते, मात्र हे धान्य दरमहा किती मिळायला हवे? नेमके किती मिळते? याची दरमहा मोजणी आता लाभार्थ्यांना देखील करता येणार आहे. रेशनकार्ड वर नमूद केलेल्या श्रेणीद्वारे तुम्हांला किती धान्य मिळाले हे तपासता येणार आहे. यात लाभार्त्यांनी PHH आणि AAY यापैकी कोणती श्रेणी मिळाली आहे, हे तपासून घयायला हवे.

PHH म्हणजे काय?
PHH चा अर्थ आहे – प्राधान्य कुटुंब (Priority Household). या गटातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला महिन्याला साधारण 5 किलो धान्य मिळते. म्हणजेच, तुमच्या कुटुंबात जितके जास्त सदस्य असतील, तितके जास्त धान्य तुम्हाला मंजूर होते. 
उदा. जर तुमच्या कुटुंबात 4 लोक असतील, तर तुम्हाला दर महिन्याला 20 किलो धान्य मिळते.

AAY म्हणजे काय?
AAY म्हणजे अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana). ही योजना सर्वात गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 35 किलो धान्य दिले जाते. कुटुंबात किती सदस्य आहेत, यावर हे प्रमाण ठरत नाही.

म्हणूनच PHH आणि AAY मध्ये धान्य मिळण्याचे प्रमाण वेगळे असते. रेशन दुकानात जाताना तुमच्या कार्डवर कोणती श्रेणी आहे आणि त्यानुसार तुम्हाला किती धान्य मिळणार आहे, हे माहिती असणे खूप गरजेचे आहे.

हेही वाचा – ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी, सोने-चांदीचे दर घसरले; नेमके भाव किती रुपयांनी घसरले जाणून घ्या…

रेशन घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात –
1. तुमच्या रेशन कार्डवर PHH की AAY ही कोणती श्रेणी आहे, हे आधी तपासून घ्या. 
2. तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि तुम्हाला किती धान्य मंजूर आहे, याची माहिती घ्या.
3. रेशन घेतल्यावर पावती घ्यायला विसरू नका आणि व्यवहाराची नोंद तपासा. 
4. जर मंजूर धान्यापेक्षा कमी धान्य मिळाले, तर तुम्ही संबंधित विभागाकडे तक्रार करू शकता.तसेच तुमच्या कार्डवरील माहिती आणि तुम्हाला मिळणारे लाभ अपडेट आहेत का, हे अधूनमधून तपासत राहा. 
5. तुमचे कार्ड PHH आहे की AAY हे माहिती असेल, तर दर महिन्याला तुम्हाला किती धान्य मिळणार आहे, याचा हिशोब ठेवणे सोपे जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number