Badlapur Bakery : केक खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा! खारीत उंदराचा वावर, केकमध्ये विष्ठा…; बदलापुरातील नामांकित बेकरीतून किळसवाणा प्रकार

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरातील बेकरी आणि डेअरींवर धाडसत्र सुरु आहे. अशातच बदलापुरातील एका नामांकित बेकरीतून अत्यंत किळसवाना प्रकार समोर आला आहे.

Badlapur Bakery : केक खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा! खारीत उंदराचा वावर, केकमध्ये विष्ठा…; बदलापुरातील नामांकित बेकरीतून किळसवाणा प्रकार

अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरातील बेकरी आणि डेअरींवर धाडसत्र सुरु आहे. अशातच बदलापुरातील एका नामांकित बेकरीतून अत्यंत किळसवाना प्रकार समोर आला आहे. बदलापुरातील अय्यंगार फ्रेश केक नावाच्या नामांकित बेकरीत उंदराची विष्ठा आढळल्याचे समोर आले आहे. बदलापुरातील नगरसेविका हर्षाली गायकवाड यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांनी याच बेकरीतून रवा केक आणले होते.

त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार अन्न औषध प्रशासन विभागाच्या पथकाने या बेकरीची पाहणी करत कारवाईला सुरुवात केली आहे. तर याच बेकरीत ठेवलेल्या खारीच्या ट्रेमध्ये देखील उंदराचा वावर आढळून आला होता.

हेही वाचा- Soya chaap Making Video Viral : तुमच्या आवडीचा सोया चाप असा तयार होतो! व्हायरल व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

बदलापूरमध्ये अय्यंगार फ्रेश केक नावाची बेकरी असून त्यांच्या बेलवली आणि कात्रप अशा 2 शाखा आहेत. हा केक खाताना हर्षाली गायकवाड यांना त्यात उंदराची विष्ठा असल्याचं आढळलं, त्यानंतर उलट्या आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी थेट सदरील बेकरी चालकाला जाब विचारला.

बेकरी चालकाने सावरा सावर करत उंदराची विष्ठा नसून चोकोचिप असल्याचं सांगितलं. मात्र केक टेस्टिंगसाठी पाठवते, असं त्यांनी म्हणताच कर्मचाऱ्यांनी चूक कबूल केली. दरम्यान या बेकरी चालकांवर कारवाईची मागणी केली जाते असून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत नेमकं काय आढळून येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number