जय महाराष्ट्र न्युज, नाशिक
नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये “राशींच्या’ खड्यांचा बाजार मांडल्याच दिसून आलं आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी शासकीय पातळीवर कसोशीने प्रयत्न होत असताना, रुग्णांसाठी देवदूतच असलेल्या डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये “राशींच्या खड्यां’चा बाजार भरल्याचा धक्कादायक जिल्हा रुग्णालयात घडला आहे.
बाल मृत्यूच्या घटना,आरोग्य सुविधांचा अभाव अशा अनेक कारणाने नेहमीच नाशिकचं जिल्हा रुग्णनालय चर्चित राहील आहे. आता तर चक्क येथील डॉक्टरचं स्वतःच भविष्य चांगलं व्हावं म्हणून तंत्रमंत्र आणि राशी खड्यांचा आधार घेताना दिसतात. या घटनेचा सर्वच थरातून निषेध होतोय तसेच संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील होत आहे
जिल्हा रुग्णालयाच्या तात्काळ कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश खेरकर हे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या समवेत बसले असताना खडे विकणासाठी आलेल्या दोन बिहारी तरुणांना कडून स्वतः साठी कोणता खडा राशीला धाराजींन आहे याची माहिती करून घेतली आणि ह्यानंतर तरुणांनी त्यांच्या हातावर वाटी फिरवीत तुमच्यासाठी पुष्कराज खडा धार्जिन असल्याच त्यांना सांगितलं. हा प्रकार सुरू असताना उपस्थित रुग्णांनी मात्र आश्चर्य व्यक्त केलं. मात्र हा प्रकार चुकीचा असल्याच सांगत ह्याची चौकशी केली जाईल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली..