बलात्काऱ्याचा हात कोयत्यानं तोडला; पीडित मुलीसह बापानं घेतला बदला

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   देशात बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. मुलींच्या अब्रूवर घाला घातला जात आहे.   पण, सबळ पुराव्याअभावी किंवा अल्पवयीन असल्यानं यापैकी अनेक घटनांमध्ये आरोपी सहीसलामत सुटत आहेत. पण, त्यामुळे आता पीडितांनीच कायदा हातात घ्यायला सुरुवात केली.   बारामतीमध्ये पीडित मुलगी आणि तीच्या वडिलांनीच भर चौकात बलात्काऱ्याचा खून करुन बदला घेण्याची धक्कादायक […]

बलात्काऱ्याचा हात कोयत्यानं तोडला; पीडित मुलीसह बापानं घेतला बदला

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

देशात बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. मुलींच्या अब्रूवर घाला घातला जात आहे.

 

पण, सबळ पुराव्याअभावी किंवा अल्पवयीन असल्यानं यापैकी अनेक घटनांमध्ये आरोपी सहीसलामत सुटत आहेत. पण, त्यामुळे आता पीडितांनीच कायदा हातात

घ्यायला सुरुवात केली.

 

बारामतीमध्ये पीडित मुलगी आणि तीच्या वडिलांनीच भर चौकात बलात्काऱ्याचा खून करुन बदला घेण्याची धक्कादायक घटना घडली. कोयत्याने जीवघेणे वार करत या

दोघांनी बलात्काऱ्याचा हात तोडून टाकला.

 

पीडित मुलगी आणि हा बलात्कारी शेजारीच राहत होते. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर या आरोपीला अल्पवयीन असल्याचा फायदा मिळाला. बालन्यायालयाकडून

आरोपीचा जामीन मंजूर झाला. त्यामुळे पीडित मुलगी आणि तीचे वडिल मुलावर चिडून होते. सुटका झाल्यानंतर या दोघांनी कोयत्यानं बलात्काऱ्यावर वार केले.

 

भर चौकात पाठलाग करुन त्याचा हात तोडला. मुलीचा बाप घटनास्थळावरुन पळाला तरी पीडित मुलगी मात्र हा बलात्कारी खरंच मेलाय की नाही हे पाहण्यासाठी थांबली

होती. यावरुन बदला घेण्याची भावना किती तीव्र होती हे लक्षात येत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number