जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कोल्हापुरातील 90 वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विष्णू नलवडेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.
4 मार्च 2015मध्ये नांगरवाडीमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणातील खटल्यात एकूण 4 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
सदरचे कृत्य हे जाणून बुजून आणि पूर्वनियोजित असल्याचा ठपका याप्रकणात ठेवण्यात आलाय. दरम्यान आरोपी विष्णू नलवडेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.