जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आईवडिलांना घराबाहेर काढून चाकूचा धाक दाखवत एका अल्पवयीन तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील न्यू आझादनगर येथे ही घटना घडली आहे.
तरूणीच्या आई-वडीलांना जीवे मारूण टाकण्याची धमकी देत त्याना भिती दाखवली आणि तरूणीच्या आई-वडीलांना घराबाहेर काढले व तरूणीवर सामूहीक बलात्कार केला. तरूणी एैकत नसल्याने तिला चाकूचा धाक दाखवत आळीपाळीनं अत्याचार केले. तर, इम्ररान खान (वय 24), जावेद शेख (वय 23), आणि किन्हा, असं बलात्कार करणाऱ्याची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून दोघांना शिताफीने अटक केल असून एक आरोपी अद्यापही फरार आहे.